महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद, धुळे

मुख्य मजकुराकडे जा

ताज्या सूचना

जिल्हा परिषद धुळे · जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग

दिव्यांग साथी धुळे

धुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सेवा आणि आवश्यक माहितीशी जोडणारे जिल्हास्तरीय डिजिटल व्यासपीठ.

  • दिव्यांग व्यक्तींना माहिती व शासकीय योजनांशी जोडणे
  • शासकीय सेवांपर्यंत पोहोच सुलभ करणे
  • स्थानिक स्तरावरील नोंदणी व माहिती व्यवस्थापनास सहाय्य
  • समावेशन व सक्षमीकरणाला प्रोत्साहन

लॉगिन सुविधा केवळ अधिकृत ग्रामपंचायत प्रशासकांसाठी आहे. नवीन ग्रामपंचायत खाते जिल्हास्तरीय मंजुरीनंतर सक्रिय होते.

हेडफोनच्या साहाय्याने संगणक प्रशिक्षण घेणारे दिव्यांग प्रशिक्षणार्थी
समान संधी · सन्मानाने जीवन

महत्त्वाच्या बातम्या व सूचना

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील निवडक अधिकृत बातम्या व अद्यतने.

स्रोत: दिव्यांग सहाय्यक पोर्टल
अधिकृत अद्यतने
सर्व बातम्या पाहा
दिव्यांग लाभार्थ्यांना तीनचाकी वाहनांचे वाटप करतानाचा कार्यक्रम

शिबिरे व उपक्रम

दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित तपासणी शिबिरे, साहाय्यक साधनांचे वाटप व इतर उपक्रमांची माहिती या विभागात प्रसिद्ध केली जाईल.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद धुळे

दिव्यांग साथी धुळे विषयी

नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या शासकीय योजनांचा पूर्ण लाभ मिळवून देणे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी नियोजनबद्ध व समन्वित प्रयत्नांची आवश्यकता असते.

या पार्श्वभूमीवर, दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच समाजात त्यांचे समावेशन व सक्षमीकरण साधण्यासाठी जिल्हा परिषद, धुळे मार्फत “दिव्यांग साथी धुळे” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पोर्टल या उपक्रमाचे डिजिटल व्यासपीठ आहे.

जिल्हा परिषद, धुळे यांची मुख्य इमारत
जिल्हा परिषद, धुळे

उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे

  • योजनांपर्यंत पोहोच

    पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना संबंधित शासकीय योजनांशी जोडणे.

  • जनजागृती

    दिव्यांग व्यक्तींचे हक्क, योजना व सुविधांविषयी जागरूकता वाढवणे.

  • प्रमाणपत्र व UDID कार्ड

    दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींची तपासणी व प्रमाणपत्र / UDID (स्वावलंबन) कार्ड मिळवण्यासाठी मार्गदर्शन.

  • संदर्भ सेवा व उपचार

    तपासणीनंतर पुढील उपचारांची गरज असलेल्यांना संदर्भ सेवा व शासकीय योजनांद्वारे उपचार सुविधा मिळवण्यास सहाय्य.

  • ओळख व नोंदणी

    जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची ओळख व नोंदणी करून माहिती ऑनलाइन उपलब्ध करणे.

  • डिजिटल माहिती व्यवस्थापन

    स्थानिक प्रशासकीय स्तरावर दिव्यांगविषयक माहितीचे डिजिटल व्यवस्थापन टप्प्याटप्प्याने सुलभ करणे.

मार्गदर्शन

दिव्यांग साथी धुळे उपक्रमास लाभलेले मार्गदर्शन

  • श्री. जयकुमार रावल

    मा. पालकमंत्री, धुळे जिल्हा

  • भाग्यश्री विसपुते

    जिल्हाधिकारी, धुळे

  • बाबासाहेब बेलदार (भा.प्र.से)

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे

दिव्यांगांसाठी महत्त्वाची माहिती

योजना व सुविधा, हक्क, प्रमाणपत्रे, शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना व बातम्या — अधिकृत शासकीय स्रोतांवरून पडताळलेली माहिती विभागनिहाय.

ग्रामपंचायत प्रशासकीय पोर्टल

स्थानिक प्रशासनासाठी डिजिटल व्यासपीठ

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे अधिकृत प्रशासक या पोर्टलवर सुरक्षितरित्या लॉगिन करून आपल्या ग्रामपंचायतीतील दिव्यांग व्यक्तींविषयीची माहिती विहित प्रपत्रांमध्ये नोंदवू व अद्ययावत करू शकतात. पंचायत समिती, नगरपालिका व जिल्हास्तरीय वापरकर्त्यांसाठीची सुविधा पुढील टप्प्यात उपलब्ध होईल.

  • ग्रामपंचायत
  • पंचायत समिती
  • नगरपालिका / नगरपंचायत
  • जिल्हास्तरीय प्रशासन
ग्रामपंचायत लॉगिन ग्रामपंचायत नोंदणी
  1. अधिकृत खातेजिल्हास्तरावरून मान्यताप्राप्त वापरकर्त्यांनाच प्रवेश
  2. सुरक्षित लॉगिनकार्यक्षेत्रानुसार मर्यादित प्रवेश
  3. माहितीची नोंदऑनलाइन अर्जाद्वारे माहिती भरणे व अद्ययावत करणे
  4. जिल्हास्तरीय आढावाएकत्रित माहितीचा जिल्हास्तरावर आढावा

संपर्क

दिव्यांग साथी धुळे उपक्रमाविषयी माहितीसाठी संपर्क साधा.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, धुळे

जिल्हा परिषद, धुळे

पत्ता
जिल्हा परिषद, धुळे सविस्तर पत्ता लवकरच उपलब्ध होईल
दूरध्वनी
लवकरच उपलब्ध होईल
ई-मेल
लवकरच उपलब्ध होईल
कार्यालयीन वेळ
लवकरच उपलब्ध होईल